Friday, March 28, 2025
Homeमहत्वाची बातमीदक्षिण कोरिया, नॉर्वे आणि कॅनडा...२४ तासांत तीन देशांत विमान अपघात, १७९ लोकांनी...

दक्षिण कोरिया, नॉर्वे आणि कॅनडा…२४ तासांत तीन देशांत विमान अपघात, १७९ लोकांनी गमावला जीव

मुंबई: हे वर्ष सरता सरता अनेक जखमा देत आहेत. या जखमा अशा आहेत ज्या कधीच भरून निघू शकणार नाही. खरंतर, गेल्या २४ तासांता तीन देशांमध्ये तीन मोठे विमान अपघात झालेत. पहिला मोठा अपघात दक्षिण कोरियात झाला. हा अपघात मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८१ लोकांना घेऊन जात असलेले जेजू एअरच्या विमानाला अपघात झाला. यात आग लागल्याने १७९ जणांचा मृत्यू झाला.

दुसरा अपघात कॅनडाच्या हेलिफॅक्स विमानतळावर झाला. येथे एअर कॅनडाचे विमानाचे एअरपोर्टवर जबरदस्त लँडिंग झाले. यात विमान रनवेवरून घसरले. आणि लँडिंग गिअर तुटल्याने त्यात आग लागली. ही घटना तेव्हाच घडली की जेव्हा विमान लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला आणि त्याचे विंग्स रनवेवर आदळले. यामुळे त्यात आग लागली.

तिसरा अपघात नॉर्वेच्या ओस्लो एअरपोर्टवर झाला. केएलएमचे विमान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास टॉर्प सँडफजॉर्ड एअरपोर्टवर उतरले. चांगली बाब म्हणजे विमानातून प्रवास करणारे सर्व १८२ लोक सुरक्षित आहेत यात चालकदलाचाही समावेश आहे. विमानाने संध्याकाळी ६.५५ वाजता ओस्लो येथून उड्डाण केले. मात्र प्रवाशांना आणि चालकाला उड्डाणानंतर मोठा आवाज ऐकू आला.

केएलएमने एका विधानात म्हटले की वेगवान आवाजामुळे पायलटला सुरक्षेसाठी टॉर्पच्या दिशेने वळावे लागले. स्थानिक मीडियाने सांगितले की पायलटने डाव्या इंजिनमधून धूर निघताना पाहिेले. यानंतर विमानाची लँडिंग करावी लागली. दरम्यान विमान रनवेवर कंट्रोल नाही होऊ शकले आणि रनवेवरून घसरून गवतात जाऊन थांबले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -