Sunil Gavaskar : सुनील गावस्करांना पाहता नितीश कुमारचे वडील झाले भावूक

  63

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. मेलबर्नमध्ये सामन्यात आठव्या विकेटसाठी नितीश कुमार रेड्डीने साजेशी कामगिरी केली. तसेच शतक झळकावून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. मुलाची शतकी खेळी पाहून वडील मुत्याला रेड्डी हे देखील भावुक झाले.त्यांनी महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या पायाला स्पर्श केला. गावस्कर यांनी भावूकपणे नितीशच्या वडिलांना मिठी मारली. रेड्डी कुटुंबीय गावस्कर यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शनिवारी मेलबर्नमधील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीशने शानदार शतक झळकावून चर्चेत आणले त्याने भारताला कठीण परिस्थितीतून सोडवले. मेलबर्न कसोटी सामना पाहण्यासाठी रेड्डी कुटुंब ऑस्ट्रेलियात आले होते. नितीशने त्याला निराश केले नाही आणि या दौऱ्यातील आपली सर्वोत्तम खेळी खेळत ११४ धावा केल्या.नितीश कुमार रेड्डीच्या शतकानंतर त्यांच्या कुटुंबाला सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांची भेट दिली. यावेळी त्यांना पाहताच नितीशच्या वडिलांनी त्यांचे पाय धरले. यावेळी नितीशचं क्रिकेट करिअर पुढे नेण्यासाठी केलेल्या मदतीसाठी नितीशच्या वडिलांनी आभार मानले. यावेळी गावस्कर यांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी सांगितलं की, मुत्याला यांच्या त्यागामुळेच भारताला नितीश कुमार रेड्डीसारखा हिरा मिळाला आहे. सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, 'आम्हाला माहिती आहे त्यांनी किती त्याग केला आहे. त्यांनी खूप संघर्ष केला आहे. तुमच्यामुळे मला अश्रू अनावर झाले. तुमच्यामुळे भारताला एक हिरा मिळाला.'




नितीशच्या आईने सुनील गावस्कर यांना सांगितलं की, मला विश्वास बसत नाही की माझा मुलगा इतक्या मोठ्या मैदानात खेळत आहे. तसेच इतकी मोठी खेळी केली. दुसरीकडे, नितीशची खेळी पाहून रवि शास्त्रीही भावुक झाले होते. त्यांनी सांगितलं की ही खेळी पाहून डोळ्यात अश्रू आले. एमसीजीच्या बॅकरूमध्ये हे भावुक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. आठव्या विकेटसाठी नितीशने १८९ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११४ धावा केल्या आणि बाद झाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात कमबॅक केलं आहे. त्यामुळे हा सामना ड्रॉ करण्याशिवाय टीम इंडियाकडे पर्याय नाही.

Comments
Add Comment

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात