Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

ट्रॅक्टर खाली दबल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर खाली दबल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

नाशिक : तालुक्यातील बदापूर येथील बंडू देवडे यांचा मुलगा सार्थक बंडू देवडे (१८) हा कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरजवळ पाण्याची बाटली ट्रॅक्टरला लावण्यास गेला असता बाटली ठेवत असताना सार्थकचा हात चुकून गिअरला लागला आणि चालू असलेला ट्रॅक्टर पुढे येऊन त्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने छातीहून मोठे चाक गेल्याने त्याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.


दरम्यान, घटनेनंतर जखमी सार्थक यास येवला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. येथील पोलीस पाटील वनिता लक्ष्मण देवडे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, येथील प्रगतशील शेतकरी तथा विकास संस्थेचे माजी अध्यक्ष कचरू देवडे यांचा तो नातू असून, या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येवला शहर पोलीस ठाण्याचे मोरे, राऊत यांनी पंचनामा केला. मनमिळावू स्वभाव असलेला सार्थक येवला येथील एंझोकेम महाविद्यालयात बारावीत शिकत होता. सर्वांशी हसून बोलत असे, गावातील सामाजिक, धार्मिक उपक्र
Comments
Add Comment