
वसई, जळगावची केळी आम्ही मस्त काहीजण एक डझन करून टाकी फस्त
बाराही महिने आम्ही असतो बाजारात शक्तिवर्धक फळ म्हणून आवडीने लोक खातात
पोटाच्या विकारावर आम्ही फायदेशीर पचनक्रिया सुधारतो धरा थोडा धीर
केळींचे शिकरण खा भारी चवदार केळींच्या जॅमला हल्ली मागणी आहे फार
पोषक तत्त्वांचे भांडार आमच्याकडे आरोग्य राखायचे देतो आम्ही धडे
शरीराला धष्टपुष्ट करतो आम्ही खरं पण सालीपासून आमच्या जपा तेवढं बरं...!
काव्यकोडी - एकनाथ आव्हाड
१) काळे, हिरवे, पिवळे पांढरे आणि लाल याच कडधान्याचे केवढे प्रकार पाहाल
खिचडी आणि आमटी लाडूसुद्धा होतात छान कोणते द्विदल धान्य ज्याला सर्वश्रेष्ठाचा मान?
२) टॅनीन, कॅफिन हानिकारक यात येते आढळून तरी येथे अनेक जण पितात भुरके मारून
घरोघरी हे पेय हमखास प्यायले जाते पाहुण्यांचे स्वागत काय देऊन होते?
३) कोवळी हिरवी सुगंधित रूचकर आणि स्वादिष्ट मुखशुद्धीसाठी ही तर आहे एकदम बेस्ट
गुजरातमधील उंझा तिची व्यापाराची पेठ जेवणानंतर हमखास कुणाची होते भेट?
उत्तर -
१) मूग २) चहा ३) बडीशेप