Navi Mumbai Airport : इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले!

  200

'या' तारखेपासून सुरु होणार व्यावसायिक विमानसेवा


नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या विमानतळावर वायुदळाचे सी २९५ आणि सुखोई ३० या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिग झाले आहे. त्यामुळे लवकरच ही सेवा सुरु होणार असून नवी मुंबई विमानतळ प्रवाशांना नववर्षाची भेट मिळाली आहे.


महिन्याभरापूर्वी नवी मुंबई विमानतळावर करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आज इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. आज दुपारच्या सुमारास व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँडिंग केले असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.



कधीपासून होणार सुरु?


येत्या नववर्षात मार्च महिन्यार्पंत विमानतळाबाबत सर्व परवानग्या मिळणार असून १७ एप्रिल २०२५ मध्ये पहिले प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होणार आहे. ही विमानसेवा देशाची सर्वात मोठी कार्गो प्रणाली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना चांगलाच फायदा होणार आहे.


दरम्यान, १७ एप्रिल रोजी देशांतर्गंत विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन जून महिन्यापर्यंत होईल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ बी.व्ही.जेके शर्मा यांनी सांगितले आहे.



काय आहेत वैशिष्टये?


नवी मुंबई विमानसेवा कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३.७ किमी धावपट्टी ऑपरेशनसाठी तयार आहे, लवकरच दुसरी धावपट्टी बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रो द्रुतगती मार्ग, अटल सेतू पूल, बुलेट ट्रेन सेवा या बहुविध वाहतूक पर्यायांमुळे विमानतळ प्रवेशयोग्य होईल आणि प्रवाशांचा प्रवास वेळ देखील कमी होणार आहे.


Comments
Add Comment

मराठा आरक्षणसाठी युवकाची आत्महत्या

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत

गेटवे-मांडवा फेरीबोटीला हवामानाचा अडथळा

प्रवाशांना जलवाहतुकीची प्रतीक्षा मुंबई : सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. समुद्रातील लाटांचीही उंची कमी

Pitru Paksh 2025: पितृ पक्षात पूर्वज कोणत्या रूपात आशीर्वाद देतात?

मुंबई : पितृ पक्षात आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची हिंदू परंपरा आहे. असे मानले जाते की या काळात

Gauri poojan: वाजत गाजत होणार आज गौराईचे आगमन, सर्वत्र उत्साह

मुंबई : गणेशोत्सवाच्या धामधुमीत ज्येष्ठा गौरींचे आज आगमन होत आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आझाद मैदानावर लाखोंचा एल्गार कायम

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस

गणेशोत्सवानिमित्त म.रे.च्या मध्यरात्री विशेष उपनगरी सेवा

मुंबई (प्रतिनिधी) : गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी म.रे. काडून छत्रपती शिवानी महारान टर्मिनस (सीएसएमटी)