मेलबर्न: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना २६ डिसेंबरला सुरू झाला आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावात बॅटिंग करत आहे. त्यांनी २ विकेट गमावले असून त्यांची धावसंख्या ५३ इतकी आहे.
मार्सन लाबुशेन आणि स्टीव्हन स्मिथ क्रीझवर आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. भारताकडून नितीश रेड्डीने सर्वाधिक ११४ धावांचे योगदान दिले.
सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ४७४ धावा करता आल्या होत्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे १५८ धावांची आघाडी आहे. या सामन्यात सर्व निकाल शक्य आहेत. आता हे पाहावे लागेल ककी भारताच्या उत्तरानंतर ऑस्ट्रेलिया किती वेळ फलंदाजी करणार आणि भारताला किती धावांचे आव्हान देणार.