Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Chandrabhaga River : चंद्रभागा स्वच्छतेसाठी महिन्याला तब्बल १० लाखांचा ठेका

Chandrabhaga River : चंद्रभागा स्वच्छतेसाठी महिन्याला तब्बल १० लाखांचा ठेका

सोलापूर : चंद्रभागा नदी पात्रातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिर समितीने चंद्रभागा नदी व मंदिर परिसर स्वच्छतेसाठी पुण्यातील एका खासगी कंपनीला महिन्याला तब्बल दहा लाख रुपयांचा, तर वर्षाकाठी सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा ठेका दिला असल्याची बाब समोर आली आहे. केवळ ठेकेदार पोसण्यासाठी मंदिर समितीने स्वच्छतेचा ठेका दिला आहे का?, असा संतप्त सवाल महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.

तर, दुसरीकडे मंदिर समितीने स्वच्छतेच्या नावाखाली होणारी पैशाची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी वारकरी महाराज मंडळींनी केली आहे. पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला येतात. येणारा प्रत्येक भाविक श्रध्देने चंद्रभागा नदी पात्रात स्नान करतो. परंतु, याच पवित्र चंद्रभागेला आता गटार गंगेचे स्वरुप आले आहे.

Comments
Add Comment