सेऊल: दक्षिण कोरियामध्ये १८१ जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. विमान लँड करत असताना रनवेवर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. यात २८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
रिपोर्टमधील माहितीनुसार या विमानात १७५ प्रवासी होते तर सहा फ्लाईट अंटेंडेंट प्रवास करत होते. हे विमान थायलंड येथून परत येत होते आणि लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झाले. एअरपोर्ट दक्षिण कोरियाच्या दक्षिणी भागात आहे.
BREAKING: New video shows moment Boeing 737-800 plane carrying 181 people onboard crashes at Muan International Airport in South Korea.
pic.twitter.com/konxWBpnWy— AZ Intel (@AZ_Intel_) December 29, 2024
न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, विमान लँडिंगकरताना रनवेवरून खाली घसरले आणि हा अपघात झाला. हा अपघात स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारासा झाला. मुआन एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काहीच दिवसांपूर्वी कझाकस्तानध्ये विमानाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. यात ३९ जणांचा मृत्यू झाला होता. २९ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले होते. हा अपघात इतका भीषण होता की विमानाचा यात चक्काचूर झाला होता.