Monday, May 12, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडी

कोकण रेल्वेमार्गावर धावणार उत्सव विशेष एक्स्प्रेस गाडी

कोकण रेल्वेमार्गावर धावणार उत्सव विशेष एक्स्प्रेस गाडी

रत्नागिरी : कोकण मार्गावरून हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) ते तिरुवनंतपुरम सेंट्रल आणि परत या मार्गावर आरक्षित उत्सव विशेष एक्स्प्रेस विशेष रेल्वेगाडी धावणार आहे.


नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण, गोवा आणि दक्षिण भारतात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.


गाडी क्रमांक ०४०८२ हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम सेंट्रल आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी हजरत निजामुद्दीन येथून २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.२० वाजता सुटेल. ही गाडी तिरुअनंतपुरम सेंट्रलला तिसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४०८१ तिरुअनंतपुरम सेंट्रलहून ही आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. या गाडीला कोकण आणि गोव्यात वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिवी आणि मडगाव येथे थांबे असतील. गाडीला एकूण १९ एलएचबी डबे असतील.

Comments
Add Comment