Vehicle Number Plate : सर्वोच्च न्यायालयाचे जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन!

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (High Security Number Plate) बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने (State Government) १ एप्रिल २०१९पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच १ एप्रिल २०१९नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.



नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट महत्त्वाची आहे. तरी सर्व संबंधीत वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या (Transport Department) https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या कामासाठी परिवहन विभागाकडून तीन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होवू शकणार नाही.


ही नंबर प्लेट बसविण्याकरिता ३१ मार्च२०२५पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. याविषयी काही अडचण, तक्रार किंवा शंका असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर किंवा dytccomp.tpt-mh@gov.in या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे. (Vehicle Number Plate)

Comments
Add Comment

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलाना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Madhav Gadgil dies : एका 'व्रतस्थ' पर्यावरण शास्त्रज्ञाला आपण मुकलो! डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरणाची मोठी हानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली

"ते केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर 'जनतेचे वैज्ञानिक' होते"; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या डॉ. गाडगीळांच्या आठवणी मुंबई :

कोट्याधीश उमेदवार! लाखोंची गाडी, लाखोंची मालमत्ता.. जाणून घ्या 'या' उमेदवारांच्या संपत्ती विषयी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. नवनवे उमेदवार आपले नशीब आजमावू पाहत आहेत. तसेच काही

कांदिवली पश्चिमेला बस प्रवाशांची तारेवरची कसरत

कांदिवली : कांदिवली पश्चिमेला एस. व्ही. रोड आणि चारकोप येथील सह्याद्री नगर समोरील मुख्य मार्गाचे काँक्रिटीकरण

मेट्रो-१ मार्गिकेच्या १२ स्थानकांवर आता सॅनिटरी पॅड देणारे यंत्र

मुंबई : घाटकोपर- अंधेरी- घाटकोपर या मेट्रो-१ मार्गिकतील सर्व बारा मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन