
पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे शहरात दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र पुणेकरांचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पुण्यातून दोन नव्हे तर सहा वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहेत.

रत्नागिरी : कोकण मार्गावरून हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) ते तिरुवनंतपुरम सेंट्रल आणि परत या मार्गावर आरक्षित उत्सव विशेष एक्स्प्रेस विशेष ...
मिळालेल्या महितीनुसार, पुण्याहून सध्या पुणे - हुबळी, पुणे - कोल्हापूर आणि मुंबई - सोलापूर व्हाया पुणे अशा दोन वंदे भारत धावत आहेत. यामध्ये आता आणखी चार एक्स्प्रेसचा समावेश केला जाणार आहे. या अतिरिक्त नव्या एक्स्प्रेस शेवगा, बडोदा, सिकंदराबाद आणि बेळगाव या मार्गांवरून धावणार आहेत.
दरम्यान, पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर आणि जलद गतीने होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या अतिरिक्त वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू केल्या जाणार आहेत.