
शिर्डी : आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डीत १२ जानेवारीला भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत असून या अधिवेशनात राज्याच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिर्डीत केले.

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा (Beed Morcha) ...
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सायंकाळी धुपारतीला साईमंदिरात हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते साई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा.सुजय विखे पाटील, आ.शिवाजीराव कर्डीले, आ.मोनिकाताई राजळे, आ.विक्रमसिहं पाचपुते, माजी आ.स्नेहलता कोल्हे, माजी विश्वस्त सचीन तांबे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदिसह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना ना.बावनकुळे यांनी सांगितले की, साईबाबा सर्वांची इच्छा पूर्ण करतात. सर्वांचे मंगलमय होऊ दे अशी साहेबांना प्रार्थना केली असल्याचे सांगत मी मागील २९ वर्षांपासून २६ एप्रिलला येतच असतो. मात्र मी शिर्डीत १२ जानेवारी २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाचे शिर्डीत अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात राज्यातून १५ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
अधिवेशनाचा शुभारंभ राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. समारोप सोहळा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्तितीत पार पडणार आहे.भाजपचे अधिवेशन शिर्डीला व्हावे अशी महाराष्ट्राची इच्छा होती. या अधिवेशनात जनतेच्या विकासाचे लक्ष पूर्ण करण्यासाठी ठराव पारित करणार आहोत तसेच पक्ष म्हणून आम्ही आमचीही भूमिका मांडणार आहोत.त्याचबरोबर विकासाचा झंजावात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू करणार असल्याचे त्यांनी म्हटले. या अधिवेशनाला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय नेतृत्व, राज्याचे सर्व मंत्रीगण उपस्थित राहणार आहे. ११ जानेवारीला शिर्डीत राज्याच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे. महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला दिलेल्या वचनाची वचनपूर्ती या अधिवेशनात महत्त्वाची ठरणार आहे.
बीड येथील मस्साजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच अधिवेशनात या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही असे सांगत कारवाई केली जाईल. यामध्ये कोणी कितीही मोठा व्यक्ती दोषी असेल त्याला शिक्षा होईल. मुख्य सूत्रधाराला शिक्षा झाली पाहिजे या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. बीड तुळजापूर मधील घटना गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चौकशी सुरू केली आहे. त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल ते महाराष्ट्राला कळणारच आहे. बीड घटनेबाबत पोलीस तपासात कुठलाही अडथळा निर्माण होता कामा नये. या संदर्भात आ.सुरेश धस यांची मी भेट घेणार आहे.
आमच्या सरकारने मागील अडीच वर्षांत काम केले आहेत.माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी या खात्याला न्याय मिळवून दिला आहे.काही धोरणात्मक निर्णय घेतले आहे, ते निर्णय पुढे न्यायचे आहे. आणि त्याबरोबर काही नवीन निर्णय देखील होणार आहे. महसूल खात्यात चांगले आमुलाग्र बदल देशाचा आणि राज्याचा अभ्यास करून करू असे आश्वासित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पारदर्शी काम करायचे असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.