Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीAmeya Khopkar On Suresh Dhas : प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंधानाच्या...

Ameya Khopkar On Suresh Dhas : प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंधानाच्या बचावासाठी मनसे मैदानात

मुंबई : बीडमध्ये वाल्मिक कराड याच्याकडून होणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची माहिती देताना भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Chaudhary), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांचे नाव घेतले होते. धस यांच्या विधानानंतर मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) हे कलाक्षेत्रातील अभिनेत्रींच्या बचावासाठी ढाल बनून मैदानात उतरले आहेत. याबाबत खोपकर यांनी एक्सवर एक पोस्ट करत धस यांना धारेवर धरले आहे.

“सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारे आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत”, असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धस यांच्या विधानानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच संपूर्ण प्रकरणावर आपण पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोगाकडून धस यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

धस यांच्या रडारवर पुन्हा ‘आका’; एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार! दोन पोलीस अधिकारीही गुंतल्याचा आरोप

आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे. परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसेच या धंद्यांच्या जोरावर प्रचंड पैसा मिळवला जातो आणि त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी (Sapna Chaudhary), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांना इथे आणले जाते असे धस म्हणाले. तसेच जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा. जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल, असे धस म्हणाले. तसेच प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात, असे देखील आमदार सुरेश धस म्हणालेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -