मुंबई : प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेच्या कारला अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला. एक मजूर जखमी झाला. उर्मिला कानेटकर कोठारे आणि उर्मिलाच्या कारचा चालक जखमी झाले. अपघात कांदिवलीत पोयसर मेट्रो स्टेशन जवळ झाला. कार वेगात होती. मजूर समोर आल्यावर चालकाने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण भरधाव वेगामुळे कारची मजुरांना धडक बसली. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.अपघातात उर्मिला कानेटकर कोठारेच्या कारच्या पुढील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तपास सुरू असल्यामुळे कार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. समतानगर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई: अभिनेत्री उर्मिला कानेटकर की कार का बुरी तरह एक्सीडेंट हो गया। कार ड्राइवर ने नियंत्रण खोते हुए दो मज़दूरों को उड़ा दिया जिनमें से एक की मौत होने की खबर है तो दूसरा गंभीर रूप से घायल है। हादसे में कार ड्राइवर और एक्ट्रेस को भी चोटें आई हैं। पुलिस के मुताबिक सही समय पर… pic.twitter.com/i11ZSmeXjj
— IANS Hindi (@IANSKhabar) December 28, 2024
याआधी शुक्रवारी घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात एक अपघात झाला. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या टेम्पोने सहा जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.टेम्पो आझाद नगरहून मच्छी मार्केटच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. यावेळी अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर, मुंबई येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात, वय २५ वर्ष, हा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणा-या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली.
Ameya Khopkar On Suresh Dhas : प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंधानाच्या बचावासाठी मनसे मैदानात
सदर अपघातामध्ये प्रीती रितेश पटेल ही ३५ वर्षीय महिला राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन महिला व एक पुरुष रेश्मा शेख, वय २३ वर्ष, मारूफा शेख वय २७ वर्ष, तोफा उजहर शेख, वय ३८ वर्षे आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय २८ वर्षे, सर्व जण राहणार चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट, घाटकोपर पश्चिम यांना मुका मार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात एका भरधाव बसने अनेक लोकांना चिरडले होते. यात नऊजणांचा मृत्यू झाला होता तर ३३ जण जखमी झाले होते.
Third Eye : मुंबई – ठाण्यात २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० जानेवारीपासून
कोण आहे उर्मिला कानेटकर कोठारे ?
उर्मिला कानेटकर कोठारे प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. उर्मिलाने ‘दुनियादारी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते ?’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र आदिनाथ कोठारे हे उर्मिलाचे पती आहेत.