नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न! सोलापूर विमानतळ कधी सुरु होणार? विमान कंपनीस हवेय सवलतीच्या दरात इंधन

सोलापूर : 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', हा वाक्प्रचार आपल्याकडे चांगलाच रूढ आहे. सध्या सोलापूर विमानतळाचेही (Solapur airport) कामकाज या वाक्प्रचाराप्रमाणे चालले आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने न चालण्याबाबत काही न काही बहाणे शोधणात पटाईत असलेल्या प्रशासनाने आता इंधनाचा नवा बहाणा शोधला आहे.


'फ्लाय ९१' या कंपनीकडून गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त जाहीर केला होता. मात्र, इंधनाच्या सुविधेचे निमित्त करत हा मुहूर्त आता जानेवारीत ढकलला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून या मागणीची पूर्तता झाल्यानंतरच सेवा सुरू होईल, अशी माहिती विमानतळाच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली.


याआधी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याचा मुख्य अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे निर्देश दिले होते. सदर चिमणी पाडल्यानंतर आता साखर कारख्यानाचा दुसरा हंगाम देखिल सुरू झाला. तरी अद्यापही सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झालेली नाही.



१५ जून २०२३ रोजी चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर यंदाचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, विमानसेवा सुरू होण्यासाठी असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून (डीजीसीए) आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी बराच काळ यामध्ये गेला.


विमानतळावरील विविध दुरुस्त्या आणि नूतनीकरणासाठी सुमारे १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता विमानतळावर टॅंकरद्वारे इंधन आणून विमानात भरण्यासाठीदेखील पेट्रोलियम मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारीत तरी सोलापूर विमानतळ (Solapur airport) सुरु होईल का, असा सोलापूरकरांना प्रश्न पडला आहे.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या