Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीरस्त्यावरील धूळ रोखण्यासाठी मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे पाणी फवारणी

रस्त्यावरील धूळ रोखण्यासाठी मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे पाणी फवारणी

रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुवून काढण्यासाठी १०० टँकर देखील तैनात

मुंबई : वातावरणीय बदलांमुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता, पालिकेने प्रमाणित कार्यपद्धतीसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. त्यामध्ये रस्ते स्वच्छतेचा देखील समावेश आहे. या अंतर्गत आता प्रमुख आणि छोट्या रस्त्यांवरील स्वच्छता व धूळ प्रतिबंधासाठी संयंत्रांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. त्याचबरोबर वर्दळीच्या रस्त्यांवर नियमितपणे पाण्याची फवारणी केली जाते. सद्यस्थितीत २४ प्रशासकीय विभागांमध्ये ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे पाणी फवारणी केली जात आहे. या सोबतच रस्ते ब्रशिंग करून, पाण्याने धुवून काढण्यासाठी १०० टँकर तैनात करण्यात आलेत. त्याद्वारे धूळ प्रतिबंध उपाययोजना केली जात आहे. त्यात ५ हजार लीटर क्षमतेच्या ६७ आणि ९ हजार लीटर क्षमतेच्या ३९ टँकरचा समावेश आहे.

वातावरणातील बदलांमुळे मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बांधकामांशी संबंधित बाबींचा देखील समावेश आहे.

आता पालिकेने त्याहीपुढे जाऊन वायू प्रदुषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या छोट्यामोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर, बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरुन वायू प्रदूषण होणार नाही. रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ, जी प्रामुख्याने प्रदूषणास कारणीभूत ठरते, ती नियंत्रित करण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना लागू केल्यात.

पालिकेने वायू प्रदूषण आणि वातावरणीय बदलाचे परिणाम ओळखून त्यावर एकसंघपणे कार्यवाही सुरू केली आहे. त्यात, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, इमारत प्रस्ताव विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि प्रशासकीय विभाग कार्यालय यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाने (वॉर्ड) आपल्या कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक गरजानुरुप उपाययोजना आखल्या आहेत. २४ प्रशासकीय विभागांमध्ये ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) पाणी फवारणी केली जात आहे. ज्या ठिकाणी बांधकाम, पाडकाम, खोदकाम सुरू आहे, अशा ठिकाणी प्रकर्षाने पाणी फवारणी केली जात आहे.

रस्ते, पदपथ स्वच्ठतेसाठी ई – स्वीपर संयंत्राचा अवलंब करण्यात येत आहे. जेणेकरून धूळीस प्रतिबंध करणे शक्य होईल. खुल्या जागेत किंवा मोकळ्या जागेत बांधकामाच्या साहित्यावर नियमितपणे पाणी फवारणी होत असल्याची खातरजमा केली जात आहे. विनापरवाना अथवा बेकायदेशीर राडारोडा वाहतूक करणा-या, तसेच वाहनावर आच्छादन न टाकता सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करणा-या वाहनांवर कारवाई केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -