मुंबई: चेहऱ्यावर पिंपल्स तसेच त्याचे डाग असतील तर चेहरा खराब दिसतो. यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील हे डाग कमी करू शकता.
मध
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. मधामुळे त्वचा मुलायम होते. सोबतच त्वचेचा रंगही निखरतो. तुम्ही मधामध्ये साखर टाकून चेहरा स्क्रब करा आणि कोमट पाण्याने धुवा.
लिंबाचा रस
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. लिंबूमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. यासाठी लिंबाच्या रसात थोडे पाणी मिसळा. त्यानंतर कापसाच्या मदतीने पिंपल्सच्या डागांवर लावा. पाच ते दहा मिनिटांनी हे धुवून घ्या.
कोरफडीचा गर
कोरफडीचा गर लावल्याने पिंपल्स त्याचे डाग या समस्या दूर होतात. तसेच कोरफड त्वचेचा मॉश्चराईज करण्याचेही काम करते. तसेच तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवते. तुम्ही डायरेक्ट चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.
दही
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. यामुळे चेहऱ्याच्या समस्या कमी होतात. तुम्ही चेहऱ्यावरील डागधब्बे दूर करण्यासाठी दह्याचा वापर करू शकता. यासाठी दही चेहऱ्यावर लावा त्यानंतर अर्ध्या तासाने धुवा.