Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीBhatinda Accident : पंजाबमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात, ८ ठार, अनेक जण...

Bhatinda Accident : पंजाबमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात, ८ ठार, अनेक जण जखमी

चंदीगड : पंजाबमधील भटिंडा येथे आज सकाळी एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.एका खासगी कंपनीची बस नियंत्रण सुटून पुलावरुन थेट नाल्यात कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

Mumbai Local News : सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडा येथील कोटशमीर रोड येथे एक बस पुलावरून जात असताना नाल्यात कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवले.बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. अपघाताच्या वेळी पाऊस सुरु असावा, त्याचवेळी बसचा वेग जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. नेमका अपघात कसा झाला, हे अजून समजू शकलेलं नाही. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. २४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -