Saturday, March 22, 2025
HomeदेशDr. Manmohan Singh : पंतप्रधानांसह मान्यवरांकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

Dr. Manmohan Singh : पंतप्रधानांसह मान्यवरांकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि पुष्पांजली अर्पित केली.

Dr. Manmohan Singh : देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज, शुक्रवारी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुष्पचक्र अर्पित केल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज, शुक्रवारी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुष्पचक्र अर्पित केल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत संवाद साधला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११. ४५ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. पहिलं उद्या सकाळी ८ वाजता डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवला काँग्रेसच्या मुख्यालयात आणलं जाणार आहे. त्यानंतर ८.३० ते ९.३० या वेळेत आम जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर असलेली डॉ. सिंग यांची लहान मुलगी आज सायंकाळपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. डॉ. मनमोहन सिंग याच्या निधनामुळे भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सरकारद्वारे आयोजित सर्व कार्यक्रम ७ दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -