Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीSuzuki चे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकींचे निधन

Suzuki चे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकींचे निधन

जपान : सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सुझुकी कंपनीच्या प्रसिद्धपत्रकानुसार लिम्फोमा या आजारामुळे ओसामु सुझुकी यांचे निधन झाले. ओसामु सुझुकी यांच्या कार्यकाळात सुझुकी कंपनीचा जगभर वेगाने विस्तार झाला. भारतातील मारुती या कंपनीसोबत सुझुकीने कार निर्मितीचा करार केला. भारतातील अनेकांचे स्वप्न मारुती सुझुकीच्या कारमुळे पूर्ण झाले. ओसामु सुझुकी यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

धस यांच्या रडारवर पुन्हा ‘आका’; एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार! दोन पोलीस अधिकारीही गुंतल्याचा आरोप

ओसामु मात्सुदा यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी जपानमधील गेरो येथे झाला. त्यांनी १९५८ मध्ये सुझुकी कुटुंबातील मुलीशी विवाह केला. जावई म्हणून ओसामु मात्सुदा हे सुझुकी कंपनीशी जोडले गेले. ओसामु मात्सुदा हे बँक कर्मचारी होते तर त्यांची पत्नी शोको सुझुकी ही कार निर्मात्या मिचियो सुझुकी यांची नात होती. लग्नानंतर ओसामु मात्सुदा यांनी स्वतःच्या नावापुढे सुझुकी हे अडनाव जोडले. इथूनच ओसामु मात्सुदा यांच्या प्रगतीला सुरुवात झाली.

Vinod Kambli : हृदय पिळवटून टाकणारा विनोद कांबळीचा ताजा व्हिडीओ व्हायरल

सुझुकी कंपनीची स्थापना मिचियो सुझुकी यांनी १९०९ मध्ये केली. पण या कंपनीत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यावर ओसामु मात्सुदा यांनी कंपनीचा विस्तार करण्यास सुरुवात केली. ओसामु मात्सुदा हे १९७८ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), प्रेसिडेंट, चेअरमन अशा वेगवेगळ्या पदांवर राहून २०२१ पर्यंत सुझुकी कंपनीची ध्येयधोरणे निश्चित करत होते. अखेर २०२१ मध्ये सुझुकी यांनी सल्लागार हे पद स्वीकारले आणि दैनंदिन कामापासून वेगळे झाले. सुझुकी कंपनीत चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ओसामु मात्सुदा यांच्या कार्यकाळात कंपनीचा अमेरिका आणि युरोपमध्येही विस्तार झाला. आज सुझुकी ही बहुराष्ट्रीय आणि बलाढ्य कार निर्माता कंपनी झाली आहे. छोट्या कारपासून एसयूव्ही पर्यंत अनेक प्रकारच्या कारची निर्मिती करणाऱ्या सुझुकी कंपनीने दुचाकींच्या क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे.

बघा : खजूर खाण्याचे फायदे

भारतात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ओसामु मात्सुदा यांच्या सुझुकी कंपनीने मारुती कंपनीशी करार केला. हा करार १९८२ मध्ये झाला. यानंतर १९८३ मध्ये मारुती सुझुकी कंपनीची मारुती ८०० ही कार लाँच झाली. ही कार दीर्घ काळ भारतात प्रचंड लोकप्रिय होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -