लाहोर : मुंबई हल्ल्याचा कथित मास्टरमाइंड हाफिज सईदचा (Hafiz Saeed) मेहुणा आणि बंदी घातलेल्या जमात-उद-दावाचा (Jamaat ud Dawa) उपप्रमुख हाफिज अब्दुल रहमान मक्की (Abdul Rehman Makki) याचा लाहोरमधील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू (Abdul Rehman Makki dies) झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मक्कीला हृदयविकाराचा झटका आला. अब्दुल रहमान मक्की हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि लाहोरमधील एका खाजगी रुग्णालयात उच्च मधुमेहावर उपचार घेत होता.
मक्की याला आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, असे जमात-उद-दावा (JuD) च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
अब्दुल रहमान मक्की याला हाफिज अब्दुल रहमान मक्की या नावानेही ओळखले जाते. त्याचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे झाला. मक्की दीर्घकाळापासून हाफिज सईदच्या अगदी जवळचा सहकारी आहे.
त्याने लष्कर आणि जमात-उद-दावा (JuD) मध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. राजकीय प्रमुख आणि लष्करासाठी निधी उभारणे यासारखी कामेही मक्कीने हाताळली.
२००० मध्ये लाल किल्ला आणि २००८ मध्ये मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी मक्कीला भारतीय एजन्सींनी आरोपी मानले होते. अमेरिकेच्या वित्त विभागाने २०१० मध्ये त्याचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता.
जेयूडी प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा मक्की याला दहशतवादविरोधी न्यायालयाने २०२० मध्ये दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
जेयूडीचे उपप्रमुख मक्की दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी शिक्षा झाल्यापासून चर्चेत होता.
पाकिस्तान मुताहिदा मुस्लिम लीग (PMML) ने एका निवेदनात म्हटले आहे की मक्की हा पाकिस्तानी विचारसरणीचा समर्थक होता.
२०२३ मध्ये, मक्कीला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्याची मालमत्ता गोठवण्यात आली होती. तसेच त्याच्यावर प्रवास बंदी आणि शस्त्रास्त्र निर्बंध घालण्यात आले होते.
मक्की त्याच्या भारतविरोधी भाषणांसाठी पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध होता. २०१७ मध्ये, त्याचा मुलगा, ओवैद रहमान मक्की, जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या कारवाईत मारला गेला. युनायटेड स्टेट्स ट्रेझरी डिपार्टमेंटने मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
अब्दुल रहमान मक्कीचे (Abdul Rehman Makki) नावही मुंबईतील हल्ल्यांशी जोडले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याविरोधात लष्कराने केलेल्या कारवाईत एकूण नऊ दहशतवादीही ठार झाले. यावेळी दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…