इंदूर : इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना 'हम दो, हमारे दो' अशी घोषणा दिली. ही घोषणा हिंदू समाजाने अंमलात आणली पण देशातील इतर धर्मियांनी ही योजना अंमलात आणणे टाळले. आज एका धर्मियांची लोकसंख्या वाढत असताना हिंदूंच्या लोकसंख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. ही चिंतेची बाब आहे, असे जैन मुनी विनम्र सागर महाराज म्हणाले. हिंदूंमध्ये प्रामुख्याने आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले जात आहे. दिशाभूल करणारी माहिती देऊन, कधी धाक दाखवून तर कधी प्रलोभने दाखवून धर्मांतरण केले जात आहे.
धस यांच्या रडारवर पुन्हा 'आका'; एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार! दोन पोलीस अधिकारीही गुंतल्याचा आरोप
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सातत्याने लक्ष्य करणारे भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) ...
जगात मुसलमानांचे ५० आणि ख्रिश्चनांचे १०० देश आहेत. भारतात बहुसंख्य हिंदू आहेत. भारतीयांनी त्यांचा २५ डिसेंबर हा आपलासा केला. एक सण म्हणून आनंदाने साजरा करायला सुरुवात केली. ज्यांचा गुरु किंवा देव या देशात जन्मला नाही त्यांचा २५ डिसेंबर आपण सर्वधर्म समभाव म्हणून साजरा करतो. प्रत्यक्षात २५ डिसेंबरच्या माध्यमातून आणि इतर वेगवेगळ्या प्रयत्नांतून हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंनी हे प्रकार ओळखणे आणि याला आळा घालणे आवश्यक आहे, असे जैन मुनी विनम्र सागर महाराज म्हणाले.
मागील काही दिवसांपासून अनेक संतमहंत, कथावाचक, प्रवचनकार हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी एकजूट होण्याचा संदेश देत आहेत. आता जैन मुनी पण हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी सक्रीय होण्यास सांगत आहेत. जैन मुनी विनम्र सागर महाराज यांनी इंदूरच्या कार्यक्रमात बोलताना थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घोषणेचा उल्लेख केल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.