मुंबई: संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्याचे आरोग्यासाठी(Health)अनेक फायदे होतात. अंड्यामध्ये प्रोटीनसह अनेक महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरास इन्स्टंट एनर्जी मिळते.
थंडीच्या दिवसांत अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. या दिवसांत शरीलाला उष्णता देणाऱ्या पदार्थांची गरज असते. त्यामुळे या मोसमात अंडीही मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. मात्र अंडी खाण्याचेही काही प्रमाण असते. थंडीच्या दिवसांत शरीर उबदार राखणयासाठी दररोज अंडी खाणे फायदेशीर ठरते.
अंड्यांमध्ये प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला गरम राखण्यात मदत होते. आज जाणून घेऊया थंडीत दररोज किती अंडी खाल्ली पाहिजे. तज्ञांनुसार थंडीच्या दिवसांत दररोज १ अथवा २ अंडी खाणे फायदेशीर ठरते.
Health: थंडीच्या दिवसांत नाही वाढणार वजन, दररोजच्या डाएटमध्ये सामील करा हे ६ पदार्थ
व्हिटामिन डीने परिपूर्ण असलेली अंडी हाडांसाठीही अतिशय परिपूर्ण आहेत. मेंदूच्या पेशींचे कार्यही सुरळीत राहते. याशिवाय हार्मोनल फंक्शनला बॅलन्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.
अंड्यामध्ये हाय प्रोटीन आणि ओमेगा ३ सारखे खास गुण असतात जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत शरीराची शक्तीही वाढवतात. थंडीच्या दिवसांत केस गळण्याची समस्याही वाढते. अशातच अंड्याचे सेवन केल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होते.