
मेलबर्न : कालपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये चौथ्या कसोटीला सुरुवात झाली आहे. हा सामना सुरु झाल्यापासून सातत्याने नवनवीन घटना घडत आहेत. अनेक चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी नेहमीच आतुरतलेले असतात. अशातच आज भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत एक चाहता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) भेटण्यासाठी सुरक्षा तोडून थेट मैदानात घुसल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर त्याने डान्स देखील केला आहे. या घटनेचा सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ठाणे : निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (५२) याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. आता विनोदचा एक ...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात फलंदाजी करत असताना ९७ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूनंतर एक प्रेक्षक स्टेडियमची सुरक्षा भेदून मैदानात आला. त्यानंतर तो पहिला स्लीपच्या दिशेला वळाला तिथे रोहित शर्मा उभा होता. पण त्याआधी विराट कोहली मध्ये दिसल्याने तो त्याच्याजवळ गेला आणि काही कळायच्या आत त्याच्या गळ्यात हात टाकून डान्स करु लागला. तसेच त्याने विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडत मैदानाबाहेर नेले.
दरम्यान, यामुळे काही काळ सामना थांबला होता. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, अशा प्रकारे एखाद्या प्रेक्षकाने मैदानात घुसण्याची पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा स्टेडियमची सुरक्षा भेदून प्रेक्षक मैदानात खेळाडूंना भेटण्यासाठी घुसले आहेत सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी १२२.४ षटकात ४७४ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या.
We have a pitch invader at the MCG. Looks like a "Free Tibet" campaign. Was it that? We couldn't spot from a distance
He's going to pay a hefty fine. #MCG #AUSvIND#AUSvIND #BoxingDayTest #BoxingDay #Melbourne pic.twitter.com/UcyCjGRFad
— Kartik Kannan (@kartik_kannan) December 27, 2024