रायपूर: छत्तीसगढच्या रायपूर येथील गुढियारी परिसराती विकास नगर येथे एक हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे घरहुती हिंसाचाराची घटना घडली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीने दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यामागचे कारण म्हणजे तिने जेवण देण्यास नकार दिला होता. पतीचा आरोप आहे की त्याची पत्नी मोबाईलमध्ये व्यस्त होती. पीडित महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीची पत्नी कामावरून परतली होती. त्याआधी आरोपी पती आफल्या मुलीला मारत होता. पत्नी आल्यावर त्याने जेवण मागण्यास सुरूवात केली. मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पत्नीने मोबाईल बघण्यास सुरूवात केली. यामुळे सुनीला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याने पत्नीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले.
यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करून डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या घटनेची सूचना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि आरोपी पतीला ताब्यात घेतले. पतीकडे या प्रकरणी चौकशी सुरू आहे.






