कोईम्बतूर : द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार, पायात काहीही घालणार नाही; अशी भीष्मप्रतिज्ञा भाजपाचे तामिळनाडू अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली आहे. ही भीष्मप्रतिज्ञा करताना पत्रकारांसमोरच के. अण्णामलाई यांनी पायातले बूट काढून हातात धरले आणि आता सत्ता आल्याशिवाय पु्न्हा चप्पल किंवा बूट वापरणार नसल्याचे जाहीर केले.
Maharashtra Politics : दिल्लीत PM मोदींसोबत शिंदेंची भेट, एक तास चर्चा; शिंदेंनी सांगितलं
अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात कारवाई झालेली नाही. ही गंभीर बाब आहे. या प्रकरणात सरकारला आणि विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणार आहे, असे सांगत के. अण्णामलाई यांनी भाजपा आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
स्वतःच्या घरासमोर शुक्रवारी आंदोलन करणार आणि स्वतःला चाबकाचे सहा फटके मारून घेणार. तसेच शुक्रवारपासून सलग ४८ दिवस उपवास करणार आहे. न्यायासाठी सहा हातांच्या मुरुगन (कार्तिकेय / गणपतीचा भाऊ) देवाला प्रार्थना करणार. यानंतर भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरासमोर सरकार विरोधात आंदोलन केले जाईल; असे के. अण्णामलाई यांनी जाहीर केले.
याआधी अण्णा विद्यापीठ प्रकरणी आंदोलन करत असलेल्या द्रमुकच्या राजकीय विरोधकांवर पोलिसांनी कारवाई केली. अण्णाद्रमुकचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यानंतर भाजपाचे आंदोलन सुरू होताच तिथे पण पोलिसांनी कारवाई केली. आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन के. अण्णामलाई यांनी द्रमुकला सत्तेतून खाली खेचेपर्यंत अनवाणी चालणार; अशी भीष्मप्रतिज्ञा केली.