Saturday, March 22, 2025
Homeक्रीडाShubman Gill : बॉक्सिंग डे कसोटीतून शुभमन गिल बाहेर

Shubman Gill : बॉक्सिंग डे कसोटीतून शुभमन गिल बाहेर

कॅनबेरा : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी बॉक्सिंग डे टेस्ट आजपासून (२६ डिसेंबर) एमसीजी, मेलबर्न येथे खेळवला जात आहे. या कसोटीसाठी दोन्ही टीमने प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलिया संघात सॅम कोन्स्टास आणि स्कॉट बोलंड यांना प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली. तर भारताने शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.पर्थमधील पहिल्या कसोटीपूर्वी शुभमन गिलला दुखापत झाल्याने तो खेळू शकला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत त्याला नक्कीच संधी मिळाली. मात्र दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३१ आणि दुसऱ्या डावात २८ धावा करून तो बाद झाला. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत तो केवळ १ धावा काढून बाद झाला. अशा स्थितीत गिलचा खराब फॉर्म आणि संघ संयोजनामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. कारण त्याच्या जागी टीम इंडियाने एका अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी या खेळपट्टीवर फिरकीपटू खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे टीम इंडियाने दोन फिरकीपटूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघात एकत्र दिसणार आहेत. सुंदरने अलीकडच्या काळात चमकदार कामगिरी केली आहे.सुंदरने आतापर्यंत ७ कसोटी सामन्यात २३.९१ च्या सरासरीने २४ बळी घेतले आहेत. फलंदाजीसह त्याने ४८.३७ च्या उत्कृष्ट सरासरीने ३८७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

IRCTC Down : आयआरसीटीसीची ऑनलाईन सेवा ठप्प! ई-तिकीट बुकींगसाठी प्रवाशांची अडचण

या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने पर्थमध्ये खेळलेला पहिला सामना २९५ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती, मात्र ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाने शानदार पुनरागमन करत १० गडी राखून विजय मिळवला. गब्बा येथे झालेली शेवटची तिसरी कसोटी अनिर्णित राहिली, त्यामुळे ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -