Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Winter : गुलाबी थंडीच्या प्रभावाने रहिवाशांची स्वेटर खरेदीसाठी उडाली झुंबड

Mumbai Winter : गुलाबी थंडीच्या प्रभावाने रहिवाशांची स्वेटर खरेदीसाठी उडाली झुंबड

परेल, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, नेरूळ, पनवेल रेल्वे स्टेशन रोडवर विक्रेत्यांसभोवताली गर्दी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला असल्याने मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात थंडीचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. सांयकाळनंतर जाणवणारी थंडी सकाळी साधारणत: आठ ते नऊ वाजेपर्यत ठिय्या मांडलेली असते. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीकडे नागरिकांची पाऊले वळाली आहे. परेल, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, नेरूळ. पनवेल रेल्वे स्टेशन रोडवर स्वेटर, मफलर, कानटोपी, स्कार्फ अशी वस्त्रे विक्रीसाठी बसलेले विक्रेते मोठ्या संख्येने दिसत आहेत.

मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही – मुख्यमंत्री

दादर, परेल परिसरात ओडिशा, आसाम येथून दरवर्षी हिवाळ्यात विक्रेते आपली दुकाने थाटतात. यंदा थंडीने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपला प्रभाव दाखविण्यास सुरुवात केल्याने स्वेटर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याने या विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे. थंडीची चाहूल लागली की परेल येथील …रामबाग व सभोवतालच्या परिसरात विक्रेते आपली दुकाने मांडतात. ओडिशा, आसाम येथून आलेले हे विक्रेते स्वेटर, हुडिज, विंटर कोट या उबदार आणि तितक्याच आकर्षक कपड्यांची विक्री करतात. दरवर्षी दिल्ली, लुधियाना, सुरत अशा ठिकाणांहून होलसेलमधून माल आणून हे विक्रेते त्याची विक्री करून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवतात. थंडी कमी झाली की त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो.

“गेल्या वर्षी थंडीने पाठ फिरवली असल्याने या उबदार कपड्यांच्या विक्रीत घट झाली होती. त्यामुळे मैलोमैलीचा प्रवास करून आलेल्या आम्हा विक्रेत्यांच्या पदरी निराशा आली होती. यंदा मात्र थंडी चांगलीच पडल्याने उबदार कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. ग्राहकांची कपडे खरेदीसाठी एकच झुंबड उडत आहे.” (- प्रेमा सिंग, विक्रेते )

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -