Thursday, October 23, 2025
Happy Diwali

Marathi language : मराठी पाऊल पडते पुढे? मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मराठी कच्चे!

Marathi language : मराठी पाऊल पडते पुढे? मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मराठी कच्चे!

छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मात्र महाराष्ट्रात अजूनही अनेकांना मराठी भाषा (Marathi language) बोलण्याचे आणि वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांतील जि.प. शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती मराठवाड्यातील पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही. तर इंग्रजी, गणितापासून विद्यार्थी चार हात लांब असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील भाषाज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. दुसरीतील ८६.८७, तर तिसरीतील ८७.५१ टक्के विद्यार्थ्यांना मोठी वाक्य वाचता येतात. पाहणीतील निष्कर्ष पहिलीतील १ लाख १६ हजार ७४१ विद्याथ्यापैकी ७७ हजार ३७० विद्यार्थी ४ ते ५ शब्द असलेले छोटी वाक्ये वाचतात. ३९ हजार ३७१ विद्यार्थ्यांना छोटी वाक्येदेखील वाचता येत नाहीत. हे प्रमाण ३३.७३ टक्के आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >