मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा नवोदित क्रिकेटर सॅम कॉन्स्टास यांच्यात शाब्दिक वाद रंगला.
१९ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकत आपल्या कसोटी करिअरची सुरूवात शानदार केली. त्याने काही आक्रमक शॉट खेळत भारतीय गोलंदाजांना त्रस्त केले. यामुळे ऑस्ट्रेलियाला सुरूवातीला आघाडी घेम्यास मदत मिळाली. मोहम्मद सिराजने १०व्या षटकात गोलंदाजी केल्यानंतर विराट कोहलीने सॅम कॉन्स्टासवर शाब्दिक हल्ला केला. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. यावेळेस उस्मान ख्वाजा, जडेजा आणि अंपायर यांनी मध्यस्थी करत प्रकरण सोडवले.
येथे पाहा विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यातील वाद
Kohli and Konstas come together and make contact 👀#AUSvIND pic.twitter.com/adb09clEqd
— 7Cricket (@7Cricket) December 26, 2024
मालिका १-१ अशा बरोबरीत
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडिया आणि यजमान संघ यांच्यात ५ सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका खेळवली जात आहे. यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या भारत संघाने विजयी सुरूवात केली होती. त्यानंतर अॅडलेड येथील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने बाजी मारत सामना जिंकला. तिसरा सामना दोन्ही संघादरम्यान अनिर्णीत राहिला. तीन सामन्यानंतर या कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत.