नांदेड : राज्यभरात तापमानाचा पारा घसरला असून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. मात्र काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणाचा (Weather Update) फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे कापूस, सोयाबीनसह फळांच्या किमती घसरत चालल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी कापसाच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली (Cotton Price Fall) होती. अशातच आता पुन्हा कापसाच्या किंमतीत ६०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली असल्याचे दिसून येत आहे.
बदलत्या वातावरणाचा फटका पपईवरही पडत (Papaya Price Fall) आहे. नांदेडमधील एका शेतकऱ्याने दीड लाख रुपये खर्च करुन पपईची लागवड केली होती. परंतु वातावरणातील बदलाचा फटका या पपईला बसत असून बाजारात पपईला कवडीमोल भाव मिळत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…