Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Lonavala Police : लोणावळ्यात खाकी वर्दीतील रक्षकचं झाले भक्षक

Lonavala Police : लोणावळ्यात खाकी वर्दीतील रक्षकचं झाले भक्षक

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. लोणावळ्यात एका पोलिसाने दारूच्या नशेत एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले आहेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार काल (दि २५) रोजी घडला.


नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते, म्हणून आरोपी पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून त्याने भाकरी घेतली आणि जेवण केलं. त्या भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला आरोपी सस्तेने पाहिलं. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि या नराधम पोलिस रस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे.



ही घटना कशी घडली ??


विसापूरच्या पायथ्याशी राहणारी पीडित मुलगी वाळूच्या ढिगाऱ्यावरती खेळत होती. या दरम्यान जेवायला आलेला आरोपी पोलीस दारूच्या नशेत होता. त्यानंतर त्याने पीडित मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले . या धक्कादायक प्रसंगानंतर चिमुकलीने तिच्या आईकडे येऊन घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलिसांना बोलावून हे प्रकरण उघडकीस आणले.
Comments
Add Comment