मुंबई : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री विशेष उपनगरीय सेवा चालवल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेने (Central Railway) दिली. या दिवशी मध्य रेल्वेवर ४ विशेष लोकल ट्रेन धावणार आहेत.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्य रेल्वेची मुख्य लाइन आणि हार्बर लाइनवर विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. याबाबत मध्य रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. अशा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला.
मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१.१२.२०२३ ते १.१.२०२४ च्या मध्यरात्रीपर्यंत प्रवाशांकरीता खालीलप्रमाणे विशेष उपनगरीय सेवा चालविण्यात येणार आहेत.
Western railway : पश्चिम रेल्वेकडून नववर्षाच्या पूर्वसंध्येला ८ विशेष उपनगरीय सेवा चालवणार
मुख्य लाइन : १ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून विशेष ट्रेन सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ३.०० वाजता पोहोचेल. तसेच १ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री १.३० वाजता कल्याण रेल्वे स्थानकावरून विशेष लोकल ट्रेन सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३.०० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री १.३० वाजता विशेष ट्रेन सुटेल. तर, मध्यरात्री २. ५० मिनिटांनी पनवले येथे पोहोचेल. तसेच पनवेल येथून १ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री १.३० वाजता विशेष ट्रेन सुटेल. तर, मध्यरात्री २. ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.