मुंबई: मुंबईच्या नागपाडा परिसरात पाण्याची टाकी फुटल्याने झालेल्या अपघातात एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू(child death) झाला आहे. तर इतर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सिद्धार्थनगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू होते. येथे काम करणारे मजूर आपल्यासाठी पाण्याची टाकी बनवत होते. ही टाकी सिमेंटने बनवली होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. यामुळे टाकीतील पाण्याचा प्रेशर वाढला आणि टाकी फुटली.
टाकीजवळ एक ९ वर्षांची मुलगी खुशी शहा खेळत होती तर तीन जण बसले होते. या दुर्घटनेत खुशीचा जागीच मृत्यू झाला.तर इतर तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत १० वर्षीय मिनाज शहा, ३२ वर्षीय गुलाम मुल्ला आणि ३५ वर्षीय नजराना अली हुसैन हे तिघे जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.