Ajit Pawar : वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा - अजित पवार

पुणे : पुणे शहरातील वाहतूककाेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी आणि वाहतूक पोलिस या सर्व घटकांना समाविष्ट करून ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार आहे. शहरातील वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. पालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात रस्त्यांच्या कामासाठी अधिक तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

शहरातील वाहतूककाेंडीसह विविध प्रश्नांसंदर्भात पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला पालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., नगर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित हाेते. शहरातील वाहतूककाेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककाेंडी साेडविण्यासाठी पुढील महिन्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी, वाहतुक पोलिस आदी सर्व घटकांना समाविष्ट करून माेबिलिटी प्लॅन तयार केला जाणार आहे.



पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांतील मिळकत कर वसुली थकली आहे. मिळकत कर आकारणीवरून ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या हाेत्या. त्यानंतर राज्य सरकारने या गावांतील मिळकत कर वसुलीला स्थगिती दिली आहे. याचा परिणाम महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नावर हाेत आहे. त्याच वेळी समाविष्ट गावांतही नागरी सुविधा पुरावायच्या आहेत. याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. त्यावर यासंदर्भात जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. त्यातून मार्ग काढला जाईल, असे पवार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई:

'आवडेल तेथे प्रवास', दिवाळीसाठी एसटीची आकर्षक योजना, कमी खर्चात प्रवासाची सुवर्णसंधी

मुंबई : अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा