Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीMukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 : बळीराजासाठी नववर्षाची भेट! सरकारने सुरु...

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 : बळीराजासाठी नववर्षाची भेट! सरकारने सुरु केली ‘ही’ गेम चेंजर योजना

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून (State Government) शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी तसेच तरुण विद्यार्थ्यांसाठीही अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा विकासदर वाढावा यासाठीही सरकार कार्यरत असते. अशातच आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmer Scheme) नववर्षाची भेटवस्तू दिली आहे. सरकारने बळीराजासाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Tuljabhavani Temple : आता २२ तास खुले राहणार तुळजाभवानीचं दर्शन!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०‘ ची (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0) घोषणा केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळू शकणार आहे. राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी १६,००० मेगावॅट वीज देण्यात येते. तर गेल्या दोन वर्षात सर्व फीडर सौर उर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सरकारने नवी योजनेची घोषणा केली आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आणि इतर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात उंब्रठा व नारंगवाडी गावातील शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. दरम्यान, सरकारच्या या उपक्रमाकडे गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -