मुंबई : बीडमध्ये मराठा (Maratha) समाजाच्या कै. संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ लालबाग येथे सेंटर पॉईंट, भारत माता सिनेमासमोर सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा मुंबई यांच्यातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात समाजातर्फे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना येत्या पंधरा दिवसात सदर हत्या प्रकरणातील दोषी आरोपी यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सदर आंदोलनात मुंबईमधील मराठा (Maratha) बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.