Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वsaffron at home : इंदूरच्या घरात केशर शेती

saffron at home : इंदूरच्या घरात केशर शेती

इंदूर : मध्य प्रदेशमधील इंदूर हे शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. खवय्यांमध्ये इंदूरची सराफा गल्ली लोकप्रिय आहे. इतिहासात इंदूर शहराची ओळख राणी अहिल्याबाई होळकर यांच्यामुळे आहे. पण आता इंदूरला नवी ओळख मिळाली आहे. ही ओळख एका प्रयोगशील शेतकऱ्यामुळे मिळाली आहे. इंदूरच्या जयस्वाल नावाच्या जोडप्याने त्यांच्या साई कृपा कॉलनीतल्या ३२० चौरस फुटांच्या घरात केशर शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. घरातल्या शेतीत सुमारे तेरा लाख रुपयांची गुंतवणूक करून इंदूरच्या जोडप्याने सुमारे दोन किलो केशराचे उत्पन्न काढण्याचे नियोजन केले आहे.

Bank Holiday : बँकांचे कामकाज तीन दिवस राहणार बंद

आंतरराष्ट्रीय बाजारात गुणवत्तेनुसार केशर प्रति किलो पाच ते आठ लाख रुपये दराने विकले जाते. यामुळे शेतीसाठी केलेली गुंतवणूक वसूल होईल; असा विश्वास जयस्वाल दांपत्याने व्यक्त केला आहे.

घरात शेती करण्यासाठी केशराचे बियाणे जम्मू काश्मीरमधील पंपोर येथून आणण्यात आले. शेतीसाठी घरात तापमान नियंत्रक यंत्रणा बसवण्यात आली. आवश्यकतेनुसार तापमान आठ ते पंचवीस अंश से. दरम्यान नियंत्रित केले जाते. खते – पाणी आवश्यक त्या प्रमाणात देऊन नियंत्रित पद्धतीने घरात केशराची शेती केली जाते. दररोज दिवसाचे चार ते सहा तास शेतीशी संबंधित कामं केली जातात.

EPFO Card : EPFO च्या नियमांत बदल; सदस्यांना लगेचच मिळणार PFचे पैसे

काश्मीरला फिरायला गेलो त्यावेळी केशराची शेती करण्याचा विचार पहिल्यांदा केला. घरात बंदीस्त वातावरणात नियंत्रित पद्धतीने ही शेती करण्याचा अभिनव प्रयोग केला. या प्रयोगाला मिळत असलेले यश बघता भविष्यात केशर शेतीतून आणखी उत्पन्न काढणे शक्य होईल, असा विश्वास जयस्वाल दांपत्याने व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -