मुंबई: बजेट एअरलाईन्स इंडिगोने आपल्या पॅसेंजर्ससाठी इंडिगो गेटवे सेल डिस्काऊंट ऑफर आणली आहे. या ऑफरच्या मदतीने ते प्रवाशांना अतिशय स्वस्त दरात विमान प्रवासाची संधी देत आहे. इंडिगोने देशांतर्गत प्रवासासाठी ११९९ रूपयांत प्रवासाची संधी आणली आहे. तर परदेशी उड्डाणांसाठी केवळ ४४९९ रूपयांमध्ये तिकीट हे एअरलाईन देत आहे.
इंडिगो गेटवे सेल डिस्काऊंटसाठी केवळ काहीच तास बाकी
तुमच्यासाठी खास बाब म्हणजे या ऑफरसाठी केवळ काहीच तास बाकी आहेत. आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत ही ऑफर सेल असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नव्या वर्षात बाहेर फिरण्याचा प्लान करत असाल तर लवकर तिकीट बुक करा.
IndiGo’s Getaway Sale is live.🎁
Book flights with fares starting at just ₹1,199.
Additionally, save up to 15% on select 6E Add-ons and get XL seats starting at ₹599.
The sale ends on 25th December, 2024. Book now: https://t.co/dj82DlGwPw. T&C Apply. #goIndiGo@FederalBankLtd pic.twitter.com/OBAWE2EICv— IndiGo (@IndiGo6E) December 23, 2024
IndiGo च्या वेबसाईटवरून अथवा IndiGo मोबाईल अॅपद्वारे तुम्ही तिकीट बुक करू शकता
इंडिगो गेटवे सेल डिस्काऊंट एक लिमिटेड सेल आहे. याच्या माध्यमातून तुम्ही आज रात्रीपर्यंत स्वस्त तिकीट बुक करू शकता. या स्वस्त तिकीटांच्या माध्यमातून तुम्ही २३ जानेवारीपासून ते एप्रिल २०२५ पर्यंतचे तिकीट बुक करू शकता. यासाठी देशांतर्गत उड्डाणांना ११९९ रूपये तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ४४९९ रूपयांत प्रवासाची संधी आहे.
डिस्काऊंट फेअरसह इंडिगोच्या अतिरिक्त ऑफर्सही
या ऑफर पीरियडसाठी डिस्काऊंटेट फेअरसोबत इंडिगोच्या अतिरिक्त ऑफर्सही आहेत. यात प्रीपेड एक्स्ट्रा बॅगेज ऑप्शनसाठी इंडिगो १५ टक्के डिस्काऊंट ऑफर करत आहे. ही ऑफर १५ किलो, २० किलो आणि ३० किलो वजनाच्या एक्स्ट्रा बॅगेसाठी आहे. याशिवाय स्टँडर्ड सीट सिलेक्शनसाठीही १५ टक्के डिस्काऊंट दिला जात आहे.