मुंबई:भारतीय संघ यावेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर(Ind vs Aus) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सध्या मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. मालिकेतील चौथा सामना बॉक्सिंगडे कसोटी होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. या सामन्याला २६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे.
याआधी भारतीय संघाचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आङे. संघाच्या कर्णधारासह ५ खेळाडूंना दुखापत झाली आहे. जाणून घेऊया कोण किती फिट आहे ते…
सर्वात आधी नेट प्रॅक्टिसदरम्यान भारताचा सलामीवीर केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर फिजिओेने त्याची तपासणी केली. सध्या तो व्यवस्थितआहे.
दुसरा सलामीवीर यशस्वी जायसवाललाही दुखाप झाली. बोटाला बॉल लागल्याने त्याला त्रास होत होता. त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. तोही सध्या ठीक आहे.
दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की त्याचा गुडघा व्यवस्थित आहे.
रोहितच्या दुखापतीच्या काही मिनिटानंतच आकाशदीपही दुखापतग्रस्त झाला. फलंदाजीदरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याने मीडियाला सांगितले की तो ठीक आहे. चिंतेची बाब नाही.
शुभमन गिलही नेट्स सेशनदरम्यान दुखापतग्रस्त झाला. सराव करताना मोहम्मद सिराजच्या बॉलवर त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतरही तो सराव करत होता.
मेलबर्न कसोटी सामन्याला २६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहेत. मध्येच एक दिवसाचा आराम असेल. अशातच पाचही खेळाडूंची फिटनेस चाचणीही होऊ शकते. आता हे पाहावे लागेल की टॉसच्या वेळेस कोणते खेळाडू प्लेईंग ११ मध्ये असतील.