मुंबई : आज सगळीकडे ख्रिसमसचं(Christmas) जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. जगभरातील माणसं आज ख्रिसमसचं जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. अशातच बॉलिवूडमधील सर्वांची लाडकी राहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.अभिनेत्री आलिया भट्टची मुलगी राहाने आज मीडियाला पाहताच ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रणबीर-आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओत पहिल्यांदा आलिया सर्व मीडियाला गोंगाट करु नका, म्हणून विनंती करताना दिसते. त्यांनतर पुढे रणबीर त्याच्या कडेवर राहाला सर्वांसमोर घेऊन येतो. राहा मीडियाला पाहताच हात हलवत “हाय, मेरी ख्रिसमस” असं म्हणताना दिसते. राहाच्या या क्यूट बोलण्याने रणबीर-आलियालाही सुखद धक्का बसतो. पुढे मीडिया फोटो – व्हिडीओमुळे राहावर फ्लॅश मारते. त्यामुळे राहा तोंड खाली करताना दिसते.
View this post on Instagram
दरम्यान, रणबीर-आलियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच राहाला पहिल्यांदाच मीडियासमोर आणलं होतं. त्यांनतर आता पुन्हा एकदा २०२४ च्या ख्रिसमसमध्ये रणबीर-आलियाने राहाला सर्वांसमोर आणलंय. यावेळी राहा पहिल्यांदा मीडियासमोर बिनधास्त बोलताना दिसली.आणि तिने मीडियाने ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहाचे हे गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. तिचा हा क्यूट अंदाज पाहून सगळे जण भारावून गेले आहेत