मुंबई: कामधेनु गायीला सर्व गायींची माता म्हटले जाते. घरात कामधेनु गायीची मूर्ती असणे शुभ मानले जाते. मात्र जर ही मूर्ती योग्य दिशेला ठेवली तर त्याचे अनेक लाभ होतात.
वास्तुनुसार घरात कामधेनु गायीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. कामधेनु गायीची मूर्ती घरात ठेवल्याने सुख, समृद्धी येते तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात.
जर तुमच्या घरातही कामधेनु गायीची मूर्ती ठेवलेली आहे तर आजच ती जागा तपासून घ्या आणि योग्य ठिकाणी ठेवा. घरात कामधेनु गायीची मूर्ती नेहमी उत्तर पूर्व दिशेला असावी.
उत्तर-पूर्व दिशा ही अध्यात्मिक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानली आहे. तुम्ही कामधेनु गाय घरात अथवा ऑफिसमध्ये ठेवू शकता. हिंदू धर्मात पूर्वोत्तर दिशेला सगळ्यात चांगले मानले आहे. या दिशेला पवित्र स्थान म्हणतात. अशी मान्यता आहे की या दिशेला देवी-देवतांचा वास असतो.
यासाठी कामधेनु गायीची मूर्ती नेहमी योग्य दिशेला ठेवा. कामधेनु गाय सर्व गायींची माता असल्याने घरात सुख-समृद्धी, धनधान्य वृद्धीसाठी ती नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवा.