Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Indian cricketer: भारताचा हा क्रिकेटर बनला बाबा, शेअर केला फोटो

Indian cricketer: भारताचा हा क्रिकेटर बनला बाबा, शेअर केला फोटो

मुंबई: भारतीय संघाचा(Indian cricketer) स्टार स्पिन ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या घरी आनंदाचा पाळणा हलला आहे. त्याने खुद्द ही बाब आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अक्षर पटेलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सांगितले की तो एका चिमुकल्याचा बाबा बनला आहे. त्याने एक फोटोही शेअर केला आहे.


अक्षऱ पटेलने आपल्या मुलाच्या नावाचाही खुलासा केलआ हे. त्याने सांगितले की मुलाचे नाव हक्श पटेल असे आहे. अक्षरने सांगितले की त्याच्या मुलाचा जन्म १९ डिसेंबरला झाला होता. मात्र इतक्या दिवसानंतर त्याने ही खुशखबर शेअर केली आहे.


दरम्यान, अक्षऱ पटेलने जो फोटो शेअर केलाय त्यात त्याच्या मुलाचा चेहरा दिसत नाही आहे. फोटोमध्ये मुलगा हक्श भारतीय संघाची जर्सी घातलेला दिसत आहे. अक्षऱ पटेलने पोस्टमध्ये लिहिले, तो सध्य पायाने ऑफ साईड समजण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही त्याला तुम्हाला भेटण्यापासूनची प्रतीक्षा करू शकत नाही.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by Axar Patel (@akshar.patel)





अक्षऱ पटेलने गेल्या वर्षी २६ जानेवारीला मेहा पटेल हिच्यासोबत विवाह केला होता. दोघेही सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात.

Comments
Add Comment