मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा या शोने १७ हून अधिक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोने भारताचेच नाही तर भारताबाहेरील प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत. आजपर्यंत या मालिकेत आगळेवेगळे प्रयोग करण्यात आले. सुंदर लेखनासह , उत्तम दिग्दर्शन तसेच अफलातून मनोरंजन याचा ताळमेळ असलेली हि मालिका कायम प्रेक्षकांच्या पसंतीस येते. यातील पात्र सुद्धा प्रेक्षकांच्या जवळची झाली आहेत.
या मालिकेतील शिक्षकांच्या जवळच पात्र म्हणजे गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे म्हणजेच अभिनेता मंदार चांदवडकर. भिडेच्या या पात्रमुळे शिक्षकांनाही हे पात्र अगदी आपलसं वाटतं. मंदार चांदवडकरने यापुर्वी सुद्धा अनेक भूमिका साकारल्या मात्र आत्माराम तुकाराम भिडे या पत्रामुळे मंदार चांदवडकर घराघरात भिडे गुरुजी म्हणूनच ओळखला जाऊ लागला. मंदार प्रमाणेच त्याची पत्नी सुद्धा सिने इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.
स्टार प्रवाह वर नुकत्याच सुरू झालेल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आत्माराम भिडेची खरी पत्नी महत्त्वपूर्ण भूमिका साकारते. याबाबत स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम वर नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली. मंदार चांदवडकर च्या पत्नीचे नाव स्नेहल असे आहे. इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये स्नेहलच्या भूमिकेची ओळख करून देण्यात आली आहे. तोंडावर गोडपण आतून कारस्थानी, पैशांचा हव्यास असणारी पण मोठी कंजूस. स्नेहलच्या पात्राचे नाव मंजुषा सावंत असे आहे.
याबद्दल तिने म्हटले आहे की, “नमस्कार मी स्नेहल मंदार चांदवडकर. आणि मी तुम्हाला भेटायला येते मंजू या भूमिकेत. लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहच्या मालिकेत मी मंजू ही भूमिका साकारते आहे. आमच्या या मालिकेत अनेक कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आहेत. त्यातली मंजू आपल्या कुटुंबासह तिच्या दादाच्या घरी राहत असते. थोडक्यात खूप आंबट गोड तिखट अशी माझी भूमिका आहे त्यामुळे ही मालिका नक्की बघा.”