मुख्यमंत्रीच ठरले चिटफंड घोटाळ्याचे बळी!

मोहन चरण माझींनी केले जागरूक राहण्याचे आवाहन


भुवनेश्वर : जनतेने कष्टाने कमावलेला पैसा गुंतवताना सतर्क राहणे आवश्यक आहे. मी स्वतः चिटफंड घोटाळ्याचा बळी ठरलो होतो. त्यामुळे जनतेने पॉन्झी योजनांबद्दल सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी (Mohan Charan Majhi) यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिन सोहळ्यात ते बोलत होते.


यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, पॉन्झी कंपन्यांचे एजंट त्यांच्या योजना अतिशय आकर्षक पद्धतीने मांडायचे आणि मीही त्यांच्या गोष्टीत येऊन गुंतवणूक केली, पण शेवटपर्यंत मला माझे पैसे मिळू शकले नाहीत असे माझी यांनी सांगितले. चिटफंडच्या नावाखाली 1990 आणि 2002 मध्ये दोन पॉन्झी कंपन्यांनी माझी फसवणूक केली. मी त्या योजनांमध्ये पैसे जमा केले, परंतु जेव्हा मॅच्योरिटीची वेळ आली तेव्हा त्या कंपन्या गायब झाल्या.



त्यानंतर फसवणूक झालेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया इतकी लांब आणि कठीण होती. त्यामुळे आपण पैसे परत घेऊ शकलो नाही. यासोबतच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी आणि पॉन्झी कंपन्यांच्या फंदात पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी केले. तसेच, अशी फसवणूक थांबवण्यासाठी जनजागृती आणि दक्षता आवश्यक आहे. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवणे हे आमचे प्राधान्य असले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, सध्या परिस्थिती खूप बदलली आहे. चिट फंड घोटाळे थांबवण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यासाठी केंद्राने आता कडक कायदे केले आहेत आणि नियम मजबूत केले आहेत. हे पाऊल ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी (Mohan Charan Majhi) सांगितले.

Comments
Add Comment

National Teachers Awards : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर! देशभरातील ४८ शिक्षकांची निवड; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण

Viral News : नवरी नटून-थटून मंडपात उभी होती, अचानक घडला असा प्रकार अन् थेट डॉक्टर बनून उपचारासाठी धावली

केरळ : केरळमधील कन्नूर (Kannur) येथे एका नवविवाहित डॉक्टरने आपल्या लग्नाच्या आनंदातही डॉक्टर (Doctor) म्हणून असलेले

Bihar Accident : क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं! वाढदिवसाच्या कार्यक्रमात बस काळ बनून आली; बिहारमध्ये भयानक अपघात घडला

बिहार : बिहारमधील बेतिया येथे मुलाच्या सहाव्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमात

Pharma Factory Blast : फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू, 6 जखमी

यादद्री : तेलंगणातील यादद्री भोंगीर जिल्ह्यात फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि