मुंबई : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावाही घेतला.
तत्पूर्वी मंत्री नितेश राणे यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच मंत्रालयात तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात होणार २० लाख घरे
त्यानंतर त्यांनी (Nitesh Rane) मंत्रालयातील दालन क्रमांक २, मंत्रालय मुख्य इमारत या दालनात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी मत्स्य व बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला.