मुंबई: भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू २२ डिसेंबरला उदयपूर येथे लग्नबंधनात अडकली. तिचे लग्न हैदराबादच्या वेंकट दत्ता साईशी झाले. वेंकट पोसाईडेक्स टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत. सिंधूने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सिंधूने पोस्टमध्ये केवळ हार्ट इमोजी शेअर केला आहे. ती या फोटोजमध्ये वेंकट दत्तासोबत लग्न एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या लग्नाचे सेलीब्रेशन २० डिसेंबरपासून संगीत सोहळ्यापासून सुरू झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी हळद, मेहंदी हे विधी झाले.
सिंधुने लग्नाच्या दिवशी क्रीम रंगाची साडी नेसली होती. तर नवऱ्यामुलाने मळखाऊ क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. सिंधुचे वडील पीव्ही रमणा यांच्या मते दोन्ही कुटुंबातील लोक एकमेकांना ओळखत होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच हे ठरले.
View this post on Instagram
वेंकट दत्ता साईबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी फाऊंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन येथून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस/लिबरल स्टडीजमध्ये डिप्लोमा केला आहे.
त्यांनी २०१८मध्ये फ्लेम युनिर्व्हसिटी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन येथून बीबीए अकाऊंटिंग अँड फायनान्स पूर्ण केले आहे.