Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीRepublic Day 2025: प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही?

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही?

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन(Republic Day 2025) सोहळ्यातील संचलनात परवानगी मिळालेली नाही. २६ जानेवारी २०२५ रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले. पण या यादीत सध्या तरी महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही.

नवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर तीनही सैन्यदलांसाठी वेगवेगळ्या राज्यातील चित्ररथांच्या कार्यक्रमाचा सहभाग असतो. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच लक्षणीय ठरतो. मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठी रंगभूमीच्या १७५ वर्षांच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला व अगदी अखेरच्या क्षणी तो मंजूर झाला. तर २०२३ मध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि नारीशक्तीवर आधारित आधारलेल्या चित्ररथाचे संचालन करण्यात आले होते. मात्र, २०२५ मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चित्ररथ निवडण्याबाबत होणारे राजकीय वाद आणि राज्यांकडून दर वर्षी येणाऱ्या तक्रारी पाहता, प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल, असा नियम संरक्षण मंत्रालयाने या वर्षी केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या समितीच्या पसंतीला चित्ररथ उतरला पाहिजे, ही देखील नियमाची आणखी एक अट आहे.दरम्यान, २०२५ च्या चित्ररथ संचालनाच्या यादीत महाराष्ट्राला सध्यातरी स्थान मिळाले नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड हरियाणा, आंध्र प्रदेश, ही राज्ये आहेत. याशिवाय दीव-दमण, दादरा आणि नगरहवेली, आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांना परवागनी देण्यात आली आहे.विशेष बाब म्हणजे, तब्बल १० वर्षांनंतर चंदीगडच्या चित्ररथाला परवानगी देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -