

मंत्रालयात सबकुछ भाजपाच!
मंत्रिमंडळातील खातेवाटपावरही वर्चस्व कायम मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत न भूतो न भविष्यते यश मिळाल्यास महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. ...
केरळ आणि बिहार या दोन राज्यांच्या राज्यपालांची अदलाबदल झाली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद आता बिहारचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आता केरळचे राज्यपाल म्हणून कार्यरत होणार आहेत. ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.मिझोरमचे विद्यमान राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभामपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.