Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीएलॉन मस्कचा सोशल मीडिया युजर्सना मोठा झटका

एलॉन मस्कचा सोशल मीडिया युजर्सना मोठा झटका

मुंबई: एलन मस्कच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मने एक्सने आपल्या X premium+ सबस्क्रिप्शनची किंमत वाढवली आहे. याच किंमत जगभरातील अनेक भागांमध्ये वाढवण्यात आली आहे.

कंपनीने सबस्क्रिप्शनच्या किंमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामागे क्रिएटसर्ना चांगला मोबदला दिला जाणार असल्याचे कारण सांगितले आहे.

नव्या किंमतीसह युजर्सना आता अनेक नव्या सुविधा मिळतील. X premium+ आता पूर्णपणे जाहिरात फ्री असणार आहे. म्हणजेच यात तुम्हाला कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत.

X premium+ सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना रडार आणि इतर फीचर्सचा अॅक्सेस मिळेल. कंपनी यांना इतर युजर्सच्या आधी सपोर्ट देईल. जर तुम्ही नवे सबस्क्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला नवी किंमत मिळेल. तर सध्याच्या ग्राहकांना २० जानेवारीपासून नव्या किंमतीला सबस्किप्रशन मिळेल.

भारतात X premium+ च्या सबस्क्रिप्शनची किंमत १३६०० रूपये आहे. ही किंमत वाढवून आता १८,३०० रूपये करण्यात आली आहे. कंपनीने अनेक भागांमध्ये ही वाढ केली आहे. लक्षात ठेवा की या किंमती एक्स प्रीमयम प्लसच्या आहेत. या किंमत वाढीचा परिणाम X युजर्स आणि X premium युजर्सवर होणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -